Mon, Sep 24, 2018 21:02होमपेज › Sangli › सांगली : प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी कारवाई

सांगली : प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी कारवाई

Published On: Jun 23 2018 1:11PM | Last Updated: Jun 23 2018 1:08PMसांगली : पुढारी ऑनलाईन

आजपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सांगली महापालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीची मोठी कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने १ ट्रक कॅरीबॅग जप्त करुन २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर सांगली महापालिका क्षेत्रात कारवाई करण्यात आली. यात कॅरी बॅग, युज ॲण्ड थ्रो ग्लास, प्लेट, चमचे, पत्रावळी असे एख ट्रक प्लास्टिक आरोग्य विभागाने जप्त केले. तसेच २० हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.