Tue, Jul 23, 2019 07:19होमपेज › Sangli › सांगलीत चुलत भावावर ॲसिड हल्‍ला

सांगलीत चुलत भावावर ॲसिड हल्‍ला

Published On: May 26 2018 11:11AM | Last Updated: May 26 2018 11:11AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील विजयनगर चौकात सख्ख्या चुलत भावावर ऍसिड हल्ला करण्यात आला. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सागर मारुती वावरे रा. भिलवडी जखमी झाला आहे. सागरचा चुलतभाऊ अमोल राजाराम वावरे याने हा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली.

दरम्यान हा हल्ला कोणत्या कारणासाठी झाला याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सागरवर येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सागर भारती हॉस्पिटलमध्ये काम करतो. सकाळी रेल्वेतून उतरून तो कामावर निघाला असता विजयनगर चौकात ही घटना घडली. संशयित पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक पोमण यांनी सांगितले.