Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Sangli › कुपवाडमध्ये दोन मोटारसायकलच्या धडकेत एक ठार,  तीन जखमी 

कुपवाडमध्ये दोन मोटारसायकलच्या धडकेत एक ठार,  तीन जखमी 

Published On: Jun 19 2018 1:25AM | Last Updated: Jun 18 2018 5:18PMकुपवाड : वार्ताहर 

शहरातील सूतगिरणी समोरील मिरज माधवनगर रस्त्यावर रविवारी(दि.17)रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलस्वारांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात नईम रशीद पखाले(वय-20, रा.हडको कॉलनी,सांगली) हा तरुण ठार झाला तर नदीम शब्बीर मोमीन(वय-22,रा. संजयनगर,सांगली) आणि अनिकेत राजेंद्र भाट(वय- 20,रा.तासगांव) हे दोघेजण जखमी झाले असून तिस-या जखमीचे नाव समजू शकले नाही. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मयत नईम पखाली व जखमी नदीम मोमीन हे मोटारसायकलीवरून  (एम.एच.09-डी.डब्ल्यू - 7357) अहिल्यादेवी होळकर चौकाकडून यशवंतनगरकडे भरधाव वेगाने जात होते. तर दुस-या मोटारसायकलीवरून(एम.एच.10 - सी.वाय.- 0255) अनिकेत भाट आणि त्याचा मित्र(नाव समजू शकले नाही )यशवंतनगर कडून मिरजेकडे जात होते.

 या दोन्ही मोटारसायकलस्वारांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने चारही जण गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच हेल्पलाईन टीमने तात्काळ धाव घेऊन गंभीर जखमी नईम पखाली याला सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी नईम याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातामधील गंभीर जखमी नदीम मोमीन यांचेवर मिरजेतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

 अनिकेत भाट या जखमीवर मिरजेतील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून चौथ्या जखमीवर कोणत्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत याची माहिती मिळाली नाही.