Thu, Apr 25, 2019 17:51होमपेज › Sangli › सांगलीतील अपघाताने महाराष्‍ट्र हळहळला; ५ पैलवानांचा मृत्यू

सांगलीतील अपघाताने महाराष्‍ट्र हळहळला; ५ पैलवानांचा मृत्यू

Published On: Jan 13 2018 9:20AM | Last Updated: Jan 13 2018 12:53PM

बुकमार्क करा
सांगली : पुढारी ऑनलाईन

सांगली जिल्‍ह्यातील कडेगाव वांगी येथे उसाचा ट्रॅक्‍टर आणि क्रूझर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ५ पैलवानांसह सहाजण ठार झाले आहेत. तर इतर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील पैलवानांच्या मृत्यूमुळे अख्‍खा महाराष्‍ट्र हळहळला आहे. 

कुंडल क्रांती संकुलचे पैलवान कुस्‍ती मैदानासाठी क्रूझरमधून सातारा जिल्‍ह्यातील औंध येथे गेले होते. मैदानावरून परतत असता कडेगावजवळीत वांगीजवळ ट्रॅक्‍टर व क्रूझरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पै. आकाश देसाई, पै. विजय पाटील, पै. शुभम घारगे, पै. सौरभ मानेसह ६ जण जागीच ठार झाले. तर इतर ६ जखमींवर मिरजेतील रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. 

वाचा इतर महत्त्‍वाच्या बातम्या

मुलुंडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; हल्‍ल्यात ७ जखमी(व्‍हिडिओ)

कार्ती चिदंबरम यांच्या घरांवर ईडीचे छापे

सण पत्नीचा...संक्रांत पतीराजावर! 

प्रसारमाध्यमांवर ७२% भारतीयांचा विश्‍वास!