Mon, Jun 24, 2019 21:02होमपेज › Sangli › बेडगमध्ये पोलिओसदृश रुग्ण

बेडगमध्ये पोलिओसदृश रुग्ण

Published On: Dec 01 2017 11:47PM | Last Updated: Dec 01 2017 11:31PM

बुकमार्क करा

आरग : वार्ताहर 

बेडग (ता. मिरज) येथील ऊसतोडणी कामगाराच्या मुलीला पोलिओसदृश आजाराची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे. त्या गावात आरोग्य विभागाच्या वतीने पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली  आहे. 

आरग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी तत्काळ खरातवस्ती, वीज वितरण कंपनी परिसरामध्ये बालकांना लसीकरण केले. सोलापूर येथून आलेले ऊसतोडणी कामगार बेडग येथील खरातवस्ती येथे राहतात. त्यातील एका कुटुंबातील  मुलीला उपचारासाठी मिरज येथे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्या मुलीला  पोलिओ  झाल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने त्या मुलीची तपासणी करण्यात आली. आता गावामध्ये पोलिओ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, आशा वर्कर्स यांना लसीकरणामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.