Sat, Jul 20, 2019 15:44होमपेज › Sangli › जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या आज बदल्या

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या आज बदल्या

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 11:40PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेकडील आरोग्य, बांधकाम, छोटे पाटबंधारे/ग्रामीण पाणीुपरवठा, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, वित्त व शिक्षण या आठ विभागांकडील बदल्या मंगळवारी (दि. 22) होणार आहेत. ग्रामपंचायत व सामान्य प्रशासनकडील कर्मचारी बदल्या शुक्रवारी (दि.25) होणार आहेत. जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांचा कालावधी दि. 5 ते 15 मे 2018, तर पंचायत समितीस्तरावरील बदल्या दि. 26 ते 29 मे या कालावधीत करायच्या होत्या. मात्र पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्हाभर लागू केल्याने जिल्हा परिषदेकडील वर्ग तीन व चार कर्मचार्‍यांच्या बदल्या रखडल्या. पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याने आचारसंहिताही संपुष्टात आली, पण जिल्हास्तरीय बदल्यांची मुदत संपली होती. त्यामुळे या बदल्यांना मुदतवाढीची मागणी शासनाकडे केली होती. शासनाने बदल्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता जिल्हास्तरावरील बदल्या दि. 22 व दि. 25 रोजी होणार आहेत. 

आरोग्य पर्यवेक्षक/आरोग्य सहायक (पुरूष-महिला) औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरूष व महिला) या पदांच्या बदल्यासाठी मंगळवारी समुपदेशन होणार आहे. कनिष्ठ अभियंता/स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांच्या बदल्यांसाठी मंगळवारी सकाळी 11.30 ते 12.30, कनिष्ठ अभियंता बदल्या दुपारी 12.30 ते 1.30, सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी/अंगणवाडी पर्यवेक्षिका बदल्यांसाठी दुपारी 2 ते 3, कृषी अधिकारी/विस्तार अधिकारी बदल्यांसाठी दुपारी 3 ते 3.30, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक बदल्यांसाठी दुपारी 3.30 ते 4.30, सहायक लेखा अधिकारी/कनिष्ठ लेखाधिकारी/वरिष्ठ सहायक/कनिष्ठ सहायक बदल्यांसाठी दुपारी 4.30 ते 5.30, विस्तार अधिकारी (शिक्षण)/केंद्रप्रमुख बदल्यांसाठी सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत समुपदेशन होणार आहे. कक्षअधिकारी/अधीक्षक/वरिष्ठ सहायक/कनिष्ठ सहायक/चालक/परिचर/स्त्री परिचर/स्वीपर, चौकीदार/व्रणोपचारक संवर्गातील बदल्यांसाठी शुक्रवारी सकाळी 11 ते 3 या वेळेत समुपदेशन होणार आहे. विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी 3.30 ते 5 या वेळेत समुपदेशन होणार आहे.