Wed, May 22, 2019 10:39होमपेज › Sangli › ठिबक अनुदानासाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करावेत

ठिबक अनुदानासाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करावेत

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 30 2018 8:44PMसांगली : प्रतिनिधी

ठिबक अनुदानासाठी शेतकर्‍यांनी दि. 15 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुहास बाबर यांनी केले आहे. जिल्हा परिषदेत सोमवारी कृषी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी सुहास बाबर होते. कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार तसेच समिती सदस्य व शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. 

महावितरणकडे प्रलंबित असणारी वीज कनेक्शन्स तातडीने जोडावीत. शेतीसाठी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत विनाखंडित वीज पुरवठा व्हावा. त्याबाबतचा ठराव शासनाला पाठविण्याचा निर्णय झाला. महिला बचत गट व शेतकरी गटांना सेंद्रीय शेतीमाल उत्पादन व विक्री या विषयावर तालुकानिहाय मार्गदर्शन शिबिर आयोजित केली जाणार आहेत, असे बाबर यांनी सांगितले. बियाणे महामंडळामार्फत टॅग-24 या वाणाचे उन्हाळी भूईमुग हे बियाणे अनुदानावर मिळणार आहे. ते सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे. शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही बाबर यांनी केले.