Sun, May 19, 2019 12:37
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › झाकीर पट्टेवाले, राहुल शिंगटेचा जामीन फेटाळला

झाकीर पट्टेवाले, राहुल शिंगटेचा जामीन फेटाळला

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 11:07PMसांगली : वार्ताहर

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील संशयित आरोपी झिरो पोलिस झाकीर नबीलाल पट्टेवाले व वाहनचालक राहुल शिंगटे यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटणेकर यांनी फेटाळला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम व त्यांना सहाय्यक म्हणून जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले. संशयितांनी खटल्यातील कागदपत्रे मागणीचा केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला. झाकीर पट्टेवाले व राहुल शिंगटे याच्यासह 7 संशयितांविरुध्द यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर पट्टेवाले व शिंगटे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. 

तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. सरकारपक्षाच्यावतीने पुरवणीत आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.संशयितांना जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणून तपास कामात अडथळे आणू शकतात, असे मत नोंदवत न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच तपासकामात असलेल्या कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाला देता येतील. परंतु तपासाव्यतिरिक्त गैरअनुषंगिक कागदपत्रे देता येणार नसल्याचा निर्णय न्यायाधीशांनी दिला. पोलिसांनी या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे, हवालदार अनिल श्रीधर लाड, अरुण विजय टोणे, नसरुद्दीन बाबालाल   मुल्ला, गाडीचालक राहुल शिवाजी शिंगटे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पाच पोलिसांसह 11 जणांना निलंबित करण्यात आले आहे.