होमपेज › Sangli › तासगाव नपा पोटनिवडणूक; भाजपला धक्‍का देत राष्‍ट्रवादीचा वियज 

तासगाव नपा पोटनिवडणूक; भाजपला धक्‍का देत राष्‍ट्रवादीचा वियज 

Published On: Apr 12 2018 11:07AM | Last Updated: Apr 12 2018 11:07AMतासगाव : शहर प्रतिनिधी

तासगाव (जि. सांगली) नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्र. ६ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सादीया शेख यांनी भाजपच्या तायरा मुजावर यांचा १८० मतांनी पराभव केला. शेख यांना 930 तर, मुजावर यांना 750 मते मिळाती असून, नोटाला 22 मते पडली आहेत.

तासगाव शहरात प्रभाग क्रमांक ६ च्या पोटनिवडणुकीवरून झालेल्या हाणामारी नंतर अखेर राष्ट्रवादीने विजय मिळावला आहे.  निकालस्थळी सध्या भाजपचा एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही, जमावबंदी असल्याने राष्ट्रवादीकडून शांतपणे विजय साजरा करण्यात आला. 
 

Tags : sangli district, tasgaon municipality, By election, ZCP