Thu, Jul 16, 2020 09:54होमपेज › Sangli › सांगलीत युवकाची गळफासाने आत्महत्या

सांगलीत युवकाची गळफासाने आत्महत्या

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 11:15PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील कर्नाळ रस्ता परिसरातील दत्तनगरमध्ये राहणार्‍या एका युवकाने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेश पोपट काळोखे (वय 35) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री दोनपूर्वी ही घटना घडली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

सुरेश पत्नी, मुलांसमवेत दत्तनगर येथे राहत होता. तो मजुरी करीत होता. शुक्रवारी रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर रात्री दोनपूर्वी त्याने पंख्याला साडीने गळफास घेतला. दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.