होमपेज › Sangli › युवकांनी सेंद्रीय शेती करावी : ना. सदाभाऊ खोत

युवकांनी सेंद्रीय शेती करावी : ना. सदाभाऊ खोत

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 12 2018 7:36PMवाळवा : प्रतिनिधी

सेंद्रीय शेती ही आजची खरी गरज आहे. त्यासाठी युवकांनी सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करावा, असे आवाहन कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी पडवळवाडी (ता. वाळवा) येथे बोलताना केले. येथील सचिन येवले यांनी केलेल्या केंद्रीय शेतीला ना. खोत, जि.प. महिला व बालकल्याण सभापती सुषमा नायकवडी, प्रकल्प संचालक सुरेश मगदूम, तालुका कृषी अधिकारी बी.डी. माने, सरपंच प्रमिला यादव, उपसरपंच अतुल कोकाटे, रयत क्रांती संघटनेचे सागर खोत, संजय खोत, अशोक खोत, शरद खोत आदींनी भेट दिली. इस्लामपूर नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये सेंद्रीय शेतीमाल विक्रीसाठी दोन गाळे उपलब्ध करून दिले जातील, अशी घोषणा ना. खोत यांनी केली.

यावेळी सचिन येवले यांच्या सेंद्रीय शेतीमाल विक्री केंद्राचा शुभारंभ ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये सेंद्रीय शेतीमाल, धान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.