Tue, Sep 17, 2019 22:23होमपेज › Sangli › सांगली : अनैतिक संबंधातून युवकाचा खून

सांगली : अनैतिक संबंधातून युवकाचा खून

Published On: May 26 2019 8:34PM | Last Updated: May 26 2019 8:34PM
शिराळा  ः  प्रतिनिधी 

 तडवळे (ता. शिराळा) येथे अनैतिक संबंधातून भगवान शंकर पाटील (वय 31)  या युवकाचा खून करण्यात आला. काट्या, लाथाबुक्कयांनी जबर मारहाण करून हा खून करण्यात आला. याप्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली असून 30 मे पर्यंत  त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी प्रताप जयसिंग पाटील,  अनिकेत प्रताप पाटील, शोभा प्रताप पाटील (सर्व रा. तडवळे),  रामराव दादू पाटील, नानासो दादू पाटील (रा. कणदूर, ता. शिराळा) या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. भगवान पाटील याचे वडील शंकर गोपाळ पाटील यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

शनिवार (दि.25) रोजी सायंकाळी सहा वाजता भगवान पाटील हा घरातून दवाखान्यात जातो असे कारण सांगून निघून गेला. त्यानंतर रात्री दहापर्यंत त्याचा काहीच पत्ता लागला नाही. रात्री दहा नंतर भगवान यास प्रताप पाटील यांच्यासह चौघांनी मारहाण केल्याचे  वडील शंकर पाटील यांना समजले. 

शंकर पाटील हे प्रताप पाटील यांच्या वस्तीकडे पाहण्यासाठी निघाले होते. रस्त्यातच त्यांना हे संशयित हातात काठ्या घेऊन जाताना दिसले. वस्ती वरती जाऊन पाहिले असता तेथे भगवान हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला जबर मारहाण करण्यात आली होती. डोक्यात पाठीमागील बाजूस जखमा होऊन रक्त येत होते, कपाळावर उजव्या बाजूस, उजव्या हाताच्या कोपर्‍यावर दोन्ही पायाच्या मांडीवर काठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. 

शंकर पाटील यांनी भगवान यास जखमी अवस्थेत शिराळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे  सांगितले.