Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Sangli › नांद्रेजवळ ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत बुधगावचा युवक ठार

नांद्रेजवळ ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत बुधगावचा युवक ठार

Published On: Apr 09 2018 1:40AM | Last Updated: Apr 09 2018 1:37AMसांगली : प्रतिनिधी

मिरज तालुक्यातील नांद्रेजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत बुधगावचा युवक जागीच ठार झाला. रोहित गजानन पवार (वय 24) असे त्याचे नाव आहे. रविवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

रोहित कुटुंबासमवेत बुधगाव येथे राहतो. कुंडल परिसरातील एका कारखान्यात तो काम करीत होता. रविवारी पहाटे बुधगावला येण्यासाठी तो कुंडलहून निघाला. नांद्रेजवळ आल्यानंतर समोरून येणार्‍या भरधाव ट्रॅक्टरला (एमएच 23 बी 7211) त्याच्या दुचाकीने (केएल 11 व्ही 5731) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की रोहित रस्त्यावर जोरात आपटला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्‍तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. 

अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर तेथेच सोडून पळून गेला. त्यानंतर रस्त्यावरून जाणार्‍या ग्रामस्थांनी रोहितला सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला आहे.