Mon, Aug 19, 2019 17:57होमपेज › Sangli › सांगलीत युवकावर खुनीहल्ला

सांगलीत युवकावर खुनीहल्ला

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 11 2018 12:37AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील गणेशनगर येथे पूर्ववैमनस्यातून एका युवकाच्या घरात घुसून त्याच्यावर कोयता, चाकूने खुनीहल्ला करण्यात आला. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पाचजणांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सागर ज्ञानू सरगर, संजय ज्ञानू सरगर, चंद्रकांत कृष्णा सरगर, अमित चंद्रकांत सरगर, राजू सरगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन जयवंत सरगर (वय 36) याने फिर्याद दिली आहे. यामध्ये सचिनसह विशाल वसंत यमगर, शालन जयवंत सरगर, जयवंत सुखदेव सरगर जखमी झाले आहेत. 

सागर आणि सचिनध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री सागर सर्व संशयितांना घेऊन सचिनच्या घरात शिरला. पूर्वी झालेल्या भांडणाचा जाब विचारत त्याने कोयत्याने सचिनवर वार केले. यामध्ये तो जखमी झाला. यावेळी 

भांडण सोडविण्यासाठी गेलेले सचिनचे आई, वडील व भावालाही मारहाण करण्यात आली. यावेळी जखमींना कोयता, चाकू, स्टंपने मारहाण करण्यात आली. यावेळी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकीही त्यांना देण्यात आली.