Wed, Jan 23, 2019 00:59होमपेज › Sangli › पोलिस ठाण्यात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलिस ठाण्यात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Aug 01 2018 8:46PM | Last Updated: Aug 01 2018 8:46PMजत (जि. सांगली) : प्रतिनिधी

जत पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या एकाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी  त्याला तातडीने  ग्रामीण रुग्णालयांत दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. सोमनाथ सुरेश रुकडे (वय-33,रा.सातारा) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरुणाचे नाव आहे. जत पोलिस ठाण्यात रूकडे याच्याविरोधात गुन्हा  दाखल झाला आहे.

सोमनाथ रुकडे हा विषारी औषध पिऊन तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात आला होता. कौटुंबिक वादातून शहरातील काही तरूण त्याला त्रास देत होते . त्यांच्या विरोधात त्याला तक्रार द्यायची होती. पोलिस तक्रार घेत असताना त्याला त्रास होऊ लागला, उलट्या होऊ लागल्याने त्याला पोलिसांनी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी असता त्याने विषारी औषध पिल्याचे स्पष्ट झाले. त्याची झडती घेताना त्याच्या खिशात कमांडो रॅड पावडर या किटकनाशकाचे पाकिट सापडले. 

ग्रामीण रूग्‍णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्‍याला मिरज येथे हलविण्यात आले आहे.