Sun, Apr 21, 2019 02:09होमपेज › Sangli › सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा : तालुका स्तरावर मोकाशेवाडीला प्रथम क्रमांक  

सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा : तालुका स्तरावर मोकाशेवाडीला प्रथम क्रमांक  

Published On: Aug 12 2018 6:36PM | Last Updated: Aug 12 2018 6:36PMयेळवी : प्रतिनिधी 

सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धेत जत  तालुका स्तरावर मोकाशेवाडी या गावाने प्रथम क्रमांक पटकावला. तर बागलवाडी या गावाने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक कुलाळवाडी  या गावाने पटकावला आहे. हा बक्षीस वितरण सोहळा पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  पार पडला.

दुष्काळी जत तालुक्यात सर्वाधिक  म्हणजे १०६ गावानी सहभाग  घेतला होता .श्रमदानातून व यंत्राद्वारे पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेस वाव देत  पाण्यासाठी  लोकचळवळ निर्माण केली होती. सलग ४५  दिवस उस्फूर्तपणे काम चालले होते. यात उस्फूर्तपणे गावकर्‍यांनी लोकसहभाग  नोंदविला होता. बालचमू ते वयाची ७५ गाठलेल्या वृद्धांनी देखील या श्रमदानात सहभाग घेतला होता. आघाडीवर असलेल्या गावनिहाय झालेल्या कामाचे  मूल्यमापन पाणी फौडेशनच्या कमिटीने केले होते.

अनेक गावे झाली पाणीदार.......

जलसंधारणातून जलक्रांतीकडे अनेक गावांनी वाटचाल केली. मोकाशेवाडी पाणी फाऊंडेशन अंतर्गत झालेल्या कामाची उपस्थितांनी समाधान व्यक्त केले होते. मोकाशेवाडी येथे श्रमदानातून ४२०० घनमीटर काम केले आहे. तर यंत्राद्वारे ८४००० घनमीटर काम झाले आहे. असे एकूण ८८२०० घनमीटर काम झाले आहे .यात रोपवाटिका ,शोषखड्डे ,शेततळी ,समतल चर ,मातीनाला बांध ,ओढापत्रातील गाळ काढणे, नाला खोलीकरण व सरळीकरण चे कामे हाती घेण्यात आली होती. मोकाशेवाडी या गावास पाणी फौडेशन ने दहा लाखांचे बक्षीस व मुख्यमंत्रींनी घोषित केलेले पाच लाख मिळणार आहेत. गतवर्षी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या बागलवाडी या गावांस  द्वितीय क्रमांकावर  समाधान मानावे लागले. तर कुलाळवाडी या गावास तृतीय क्रमांक मिळाला. या कामाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंवढी व दुसरा क्रमांक आलेल्या बागलवाडी गावात पाणी फौडेशन च्या कामाची पाहणी करुन कौतुक  केले  होते. याचबरोबर आंवढी,देवनाळ,मायथळ या गावातील पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून  जलसंधारणाची कामे चांगली झाली आहेत.

गावातील ग्रामस्थाचे सहकार्य झाल्यास गाव आदर्शवत होऊ शकते.

सरपंच आण्णासाहेब गायकवाड. (मोकाशेवाडी )

मोकाशेवाडी ता.जत येथील  जनतेस जलसंधारणाच्या कामाची महिती व महत्व पटवून दिल्याने ५ वर्षांच्या लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत  सर्वांनी  एकत्रित येऊन  चांगले काम केले. त्यामुळे गावास प्रथम क्रमांक मिळाला आहे. गावाच्या हिताकरिता योगदान दिलेल्या ग्रामस्थांचे आभार मानतो.
 जत वॉटर कप स्पर्धा 
पहिला-  मोकाशेवाडी -१०.लाख व पुरस्कार 
दुसरा-  बागलवाडी,-७.५० सात लाख पन्नास हजार 
तिसरा-  कुलाळवाडी -५. पाच लाख