Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Sangli › येलूर फाट्यानजिक कारला धडक: वृद्धा ठार

येलूर फाट्यानजिक कारला धडक: वृद्धा ठार

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:34PMकुरळप : वार्ताहर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येलूर (ता. वाळवा) फाट्यानजिक कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुनंदा बाबासाहेब देसाई (वय 65, मूळ गाव- गारगोटी, सध्या रा. गोंदी, ता. कराड) या जागीच ठार झाल्या.  त्यांचे पती बाबासाहेब विष्णू देसाई (वय 70) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी झाला. या अपघाताची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे. 

देसाई पती-पत्नी कार (एम.एच.11/वाय-7461) ने मूळ गावी गारगोटीकडे निघाले होते.  त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली.  कार महामार्गाच्या कडेला असणार्‍या झाडावर जाऊन आदळली. सुनंदा देसाई यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. बाळासाहेब देसाई गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चंद्रकांत शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक बाजीराव मोरे अधिक तपास करीत आहेत.