Thu, Apr 25, 2019 12:02होमपेज › Sangli › सांगलीत उद्या रंगणार लोखंडी पिंजर्‍यात कुस्तीचा थरार

सांगलीत उद्या रंगणार लोखंडी पिंजर्‍यात कुस्तीचा थरार

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 16 2018 9:20PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगलीत गुरुवारी (दि. 18) देशात प्रथमच लोखंडी पिंजर्‍यातील कुस्तीचा थरार रंगणार आहे. येथील डॉ. आंबेडकर स्टेडियमवर सायंकाळी 6 वाजता ही कुस्ती होणार आहे. 32 फूट लांब व रुंद लोखंडी पिंजर्‍यात होणार्‍या कुस्तीत बेल्जियममध्ये सराव करणारा  125 किलो वजनाचा डब्ल्यूडब्ल्यूएफ चॅम्पियन मनजितसिंग याच्याशी खटावचा खटावचा (जि. सातारा) मल्ल उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत (120 किलो) भिडणार आहे. लाल मातीच्या कुस्तीची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पैलवान कुस्तीप्रेमी संस्थेच्यावतीने या मैदानाचे आयोजन केल्याचे संस्थापक अध्यक्ष पैलवान मारुती जाधव यांनी सांगितले. 

उपाध्यक्ष गणेश मानुगडे, सचिव सागर साळोखे, नगरसेवक गौतम पवार, माजी स्थायी सभापती हरिदास पाटील   उपस्थित होते.  जाधव म्हणाले,   पैलवान कुस्तीप्रेमी संस्थेच्या वतीने 18 जानेवारीरोजी  मनजितसिंग विरुद्ध किरण भगत ही एकमेव भव्य कुस्ती आयोजित केली आहे. 

मानगुडे म्हणाले, या कार्यक्रमाचे ‘तुझ्यात जीव गुंतला’ फेम  अभिनेते हार्दिक जोशी (राणा दा) हे आकर्षण असणार आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले,  खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे, खासदार संजय पाटील,आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार संभाजी पवार, दिनकर पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, आयुक्त रविंद्र खेबुडकर, संभाजी सावर्डेकर, रणजित खाशाबा जाधव उपस्थित राहणार आहेत.