Fri, Nov 16, 2018 15:13होमपेज › Sangli › सांगली : बालगाव आश्रममात विश्वविक्रमी योग(Video)

सांगली : बालगाव आश्रममात विश्वविक्रमी योग(Video)

Published On: Jun 21 2018 2:41PM | Last Updated: Jun 21 2018 8:37PMजत: प्रतिनिधी

बालगाव (ता. जत) येथील गुरूदेव आश्रममध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनी तीन विश्वविक्रमांची नोंद झाली. पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थी, नागरिकांनी एकाचवेळी सूर्य नमस्कार घातला. ज्ञानयोगी सिध्देश्वर स्वामीजी, गुरूदेवाश्रम बालगाव मठाचे अमृतानंद महास्वामीजी, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह, महाराष्ट्र, कर्नाटकतील अनेक मंत्री, आमदार, माजी आमदार, सभापती, जिल्‍हा परिषद सदस्य, व आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरासाठी अधात्मातील गुरूवर्य  सिध्देश्वर महास्वामीजी, महसूस,  सा बां मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,  खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, जिल्‍हा परिषद शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, डॉ. रविंद्र अरळी, भाकर जाधव आदी उपस्थित होते. 

एशियन बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड, मार्व्हलस बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड, हायरेंज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड या तीन ठिकाणी विश्वविक्रमाची नोंद झाली. आश्रमाचे अमृतानंद महास्वामी यांनी स्वागत,  जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी प्रास्ताविक केले.