इस्लामपूर : प्रतिनिधी
दै. पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने सभासद महिलांना पंजाबी डिशेसचे प्रशिक्षण उद्या शुक्रवार, दि. 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता आयोजित केले आहे. आष्टा येथील शिंदे चौकातील दत्त मंदिराजवळील लांडे कॉम्प्लेक्समध्ये हे प्रशिक्षण होणार आहे.
या वर्कशॉपमध्ये हॉटेल पद्धतीच्या पंजाबी डिशेश महिलांना शिकविल्या जाणार आहेत. लहान मुलांपासून वृद्ध मंडळींपर्यंत आज पंजाबी डिशेश सर्वांनाच आवडतात. हॉटेलमध्ये जावून त्याचा आस्वाद घेणे सर्वांनाच शक्य होत नाही. रोजच्या जेवणामध्ये बदल असल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहते. नेमका याच उद्देशाने घरातील सुग्रण असणारी महिला अधिक सुग्रण व्हावी. तिला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ बनविता यावेत. पैशाचीही बचत व्हावी यातूनच पुढे पंजाबी डिशेस बनविणार्या महिला तयार व्हाव्यात. दररोजच्या विविध पदार्थांमधून मसाल्याचा आणि तेलाचा अतिरेक टाळावा व संपन्न आरोग्य घडावे यासाठीच या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगली येथील मीना जाधव, हेमा गांधी या वर्कशॉपमध्ये विविध पंजाबी डिशेस यामध्ये पालक पनीर, पनीर टिक्का, पनीर बटर मसाला अशा अनेक डिश शिकविणार आहेत. हे वर्कशॉप कस्तुरी सभासदांसाठीच असून पूर्णपणे मोफत आहेत. येताना सोबत वही, पेन घेवून यावे. अधिक माहितीसाठी कस्तुरी क्लबच्या संयोजिका मंगल देसावळे मो. नं. 8805023883 व दै. पुढारी नं. 222333 वरती संपर्क साधावा.