Sun, Jul 21, 2019 05:45होमपेज › Sangli › ‘दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लब’च्यावतीने ‘नऊवारी साडी स्टिचिंग’ कार्यशाळा 

‘दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लब’च्यावतीने ‘नऊवारी साडी स्टिचिंग’ कार्यशाळा 

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 8:42PMसांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब सांगली व रिध्दी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट यांच्यावतीने खास महिलांसाठी ‘नऊवारी साडी स्टिचिंग कार्यशाळा’चे  आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा वृत्तपत्र विक्रेता भवन, त्रिकोणी बागेजवळ, सांगली येथे होणार आहे. 

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्या वतीने आतापर्यंत महिलांसाठी विविध उपक्रम तसेच विविध वर्कशॉप  घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महिलांच्या कौशल्यामध्ये भर घालण्यासाठी ‘नऊवारी स्टिचिंग कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून सांगली शहर व परिसरातील महिलांसाठी दै. पुढारी कस्तुरी क्‍लबने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. रिध्दी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या सौ. वैशाली खटके या प्रशिक्षिका म्हणून लाभल्या आहेत. त्या ‘पेशवाई डिझाईन’ चे प्रशिक्षण कार्यशाळेत देणार आहेत. 

कार्यशाळेसाठी येताना महिलांनी सोबत वही, पेन, टेप, कात्री व साडी आदी साहित्य घेऊन यायचे आहे.  कस्तुरी क्‍लब मेंबर्सना या कार्यशाळेत भाग घेण्यासाठी 100 रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. इतर महिलांसाठी प्रवेश फी 200 रुपये इतकी राहणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने करण्यात आले आहे. 

वर्कशॉप नावनोंदणीसाठी संपर्क :  

तनईम अत्तार - 7385816979
गीतांजली पाटील - 8805007176