Mon, May 20, 2019 20:14होमपेज › Sangli › वर्षानुवर्षे एकाच विभागात नियुक्‍त कामगारांच्या बदल्या

वर्षानुवर्षे एकाच विभागात नियुक्‍त कामगारांच्या बदल्या

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 10:47PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेत एकाच ठिकाणी अनेक वर्षे ठाण मांडून कर्मचार्‍यांची दुकानदारी सुरू असल्याच्या तक्रारी आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सरसकट बदलीसत्र अवलंबले आहे. त्याअंतर्गत आस्थापना विभागातील 16 कर्मचार्‍यांच्या खात्यातंर्गत बदल्यांचे त्यांनी आदेश दिले. आणखी 35 कर्मचार्‍यांच्या टप्प्याटप्प्याने  अन्य विभागात बदल्या होणार आहेत.

नगरसेवक-पदाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक विभाग कर्मचारी ठाण वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांची ‘मोनोपॉली’ होऊन दुकानदारी वाढवली आहे. हे नगरसेवक प्रसंगी नगरसेवक, वरिष्ठांनाही दाद देत नाहीत. जर त्यांची बदली केली की  पदाधिकारी-नगरसेवकांच्या हस्तक्षेपाने पुन्हा बदल्या रद्द केल्या जातात. 

विशेषतः हा प्रकार नगररचना, बांधकाम, आरोग्य,एलबीटी विभागासह अन्य विभागात जास्त आहे. श्री. खेबुडकर यांनी केलेल्या चौकशीत ठरावीक कर्मचारी दहा-पंधरा वर्षे एकाच विभागात ठाण मांडून असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून गैरकारभाराचा बाजारही मांडल्याचे दिसून आले. यामुळे नगरसेवक आणि नागरिकांचीही अडवणूक सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे आस्थापना, आरोग्य विभाग, बांधकाम,नगररचना विभाग, घरपट्टी, पाणीपट्टी या विभाग प्रमुखांना माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.