Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Sangli › रेठरेहरणाक्ष येथे ऊसतोडणी मजूर महिलेची आत्महत्या

रेठरेहरणाक्ष येथे ऊसतोडणी मजूर महिलेची आत्महत्या

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 11:30PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : शहर वार्ताहर

माहेरहून पैसे आणण्यासाठी शांताबाई श्याम शिंदे (वय 19, रा. शहापूर, जि. जालना, सध्या रा. रेठरेहरणाक्ष, ता. वाळवा) या विवाहितेला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सासरा व दीर या दोघांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. पती श्याम, दीर नाथा, सासू गुंफी, नणंद रंजना नाथा बाबर, सासरा तुकाराम अशी संशयितांची नावे आहेत. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, श्याम शिंदे व शांताबाई यांचा विवाह सात महिन्यांपूर्वी झाला होता.  सासरच्या लोकांनी माहेरहून 5 हजार रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता. मानसिक त्रास देत होते. प्रसंगी मारहाणही करीत होते. शांताबाई सासरच्या छळाला कंटाळून शुक्रवारी झोपडीतून बाहेर पडली होती. तीन दिवस घरच्यांनी शोध घेतला.  रविवारी सकाळी रेठरेहरणाक्ष बंधार्‍यानजीक कृष्णापात्रात तिचा  मृतदेह आढळला.

दरम्यान शांताबाईच्या आत्महत्त्येची माहिती माहेरच्या लोकांना समजली. त्यावेळी माहेर व सासरच्या लोकांमध्ये वादावादी झाली. आई सीताबाई बाबर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.