Fri, Aug 23, 2019 22:12होमपेज › Sangli › आष्ट्यात ‘झुम्बा’ला महिलांचा प्रतिसाद

आष्ट्यात ‘झुम्बा’ला महिलांचा प्रतिसाद

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 7:10PMइस्लामपूर : प्रतिनिधी

दै. पुढारीच्या कस्तुरी क्‍लबच्यावतीने महिलांसाठी आष्टा येथे 4 दिवस झालेल्या झुम्बा वर्कशॉपला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी चार दिवसामध्ये विविध झुम्बाचे प्रकार शिकून घेतले. हे वर्कशॉप कोटेश्‍वर मंदिराच्या हॉलमध्ये झाले. यासाठी राजाराम पवार यांचे सहकार्य लाभले. या वर्कशॉपमध्ये इस्लामपूर येथील कलाविश्‍व नृत्यसंस्कार अ‍ॅकॅडमीचे  हेमंत रकटे यांनी सर्व महिलांना मोफत प्रशिक्षण दिले. या शिबिरात हेल्थ टीप, वजन कमी करणे, बॉडी मेंटेन ठेवणे, शारीरिक ऊर्जा वाढविणे तसेच सॉफ्ट आणि निखळ त्वचेसाठी व्यायामाचे  विविध प्रकार व योगाविषयी माहिती दिली. या वर्कशॉपला माजी नगराध्यक्षा जीनत अत्तार, कविता पाटील तसेच कमिटी मेंबर सुनीता घोरपडे यांचे सहकार्य लाभले. दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्या को-ऑर्डीनेटर मंगल देसावळे यांनी संयोजन केले.