Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Sangli › महिलांनी सुसंस्कृत पिढी घडवावी

महिलांनी सुसंस्कृत पिढी घडवावी

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 10 2018 10:46PMबागणी : प्रतिनिधी

बदलत्या काळात टी. व्ही. संस्कृतीचे फॅड वाढले आहे. हे रोखण्याबरोबरच महिलांनी सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रा. डॉ.  सुषमा नायकवडी यांनी केले.

बागणी (ता. वाळवा) येथे  महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने महिला मेळावा झाला. यावेळी प्रा. डॉ. नायकवडी बोलत होत्या.  पंचायत समिती सदस्या मनीषा गावडे अध्यक्षस्थानी होत्या. सरपंच संतोष घनवट व उपसरपंच विष्णू किरतसिंग व महिला सदस्यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

प्रा. नायकवडी यांनी यावेळी महिलांनी  समावेशक, जबाबदारीने वागण्याचे  आवाहन केले. पं. स. च्या पाणीपुरवठा अधिकारी शीला गायकवाड - भासर म्हणाल्या,  स्वच्छता व पाण्याचा जपून वापर करण्यासाठी महिलांची भूमिका महत्वाची ठरते. सरपंच घनवट यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांसाठी विविध योजना राबविण्याची ग्वाही दिली.  यावेळी सौ. जाहिदा मुजावर यांनी पोवाडा सादर केला. दरम्यान, ग्रामपंचायतीच्यावतीने  महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. ग्रामसेवक सदाशिव कुलकर्णी, स्वाती जगताप, फातिमा शिकलगार, शोभा काईत, उज्ज्वला पाटील, शीतल घनवट, सविता शेळके, मुमताज चौगले, सायराबी नायकवडी, गौरी शेळके, वैशाली कारंडे, सागर गायकवाड, सतीश थोरात, महादेव पाटील, सतीश काईत आदी मान्यवर  उपस्थित होते.