Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › आशा, गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचरचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

आशा, गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचरचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 8:38PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

आरोग्य विभागाकडील आशा व गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचर संघटनेने बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार निदर्शने केली. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला. 

कॉ. शंकर पुजारी, सुमन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. आशा व गटप्रवर्तक महिला, अंगणवाडी महिला, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन स्त्री परिचर, एनआरएचएम कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत कायम करून वेतन व सामाजिक सुरक्षा द्यावी. कर्मचार्‍यांना सेवेत कायम करेपर्यंत दरमहा 18 हजार रु. किमान वेतन द्यावे, अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी व अंशकालीन स्त्री परिचर यांना वाढीव मानधन मिळावे, अशी मागणी करण्यात आली. 

शंकर पुजारी म्हणाले, नॅशनल हेल्थ मिशनच्या योजनेतील भ्रष्टाचार थांबल्यास आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा 18 हजार रुपये वेतन देणे सहज शक्य आहे. अंगणवाडी कर्मचारी, पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.