Tue, Dec 10, 2019 13:22होमपेज › Sangli › स्वच्छता निरीक्षकासह चार कर्मचारी निलंबित

स्वच्छता निरीक्षकासह चार कर्मचारी निलंबित

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 07 2017 12:40AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

कुत्री पकडून त्यांना मारणे व त्याचे शुटिंग करणे, कामात हलगर्जीपणाबद्दल स्वच्छता निरीक्षकासह चार कर्मचार्‍यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी ही कारवाई केली. निरीक्षक श्रीकांत मद्रासी, कर्मचारी विष्णु कांबळे, सचिन माकडवाले आणि भूपाल मल्लेवाडे अशी त्यांची नावे आहेत.

शहरातील मोकाट कुत्री पकडण्यासाठी डॉगव्हॅन आहे. त्या डॉगव्हॅनवरील कर्मचार्‍यांनी कुत्री पकडल्याचे आणि ती मारून टाकल्याचे चित्रीकरण झाले होते. ते चित्रीकरण एका सामाजिक कार्यकर्त्याला मिळाले होते.  त्याने आयुक्‍तांकडे तक्रार केली. त्या तक्रारीनुसार अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार खेबुडकर यांनी कारवाई केली. 

दोन आठवड्यांपूर्वी नगरविकास राज्यमंत्री रवींद्र वायकर येथे आले होते. त्यांनी शहरात राबविलेल्या घरकुल योजनेच्या कामात बोगसगिरीचा आरोप केला होता. शिवाय कामकाजात त्रुटी काढल्या होत्या. यामुळे या कामात हलगर्जीपणाबद्दल भूपाल मल्लेवाडे यांना निलंबित करण्यात आले.