Tue, Mar 19, 2019 20:27होमपेज › Sangli › सांगलीसह जिल्ह्यात वादळी पाऊस

सांगलीसह जिल्ह्यात वादळी पाऊस

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 12:14AMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज, आष्टा परिसरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी  मंगळवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस झाला. दोन दिवसांच्या उघडिपीनंतर  झालेल्या पावसामुळे हवेत गारवा आला होता.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामासाठी मशागतींच्या कामांना हा पाऊस उपयुक्‍त ठरणार आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पारा 42 अंशांपर्यंत गेल्याने उन्हाळा चांगलाच जाणवत होता. उकाड्याने लोक हैराण झाले होते. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती.