Sat, Aug 24, 2019 22:18होमपेज › Sangli › वारणाकाठच्या शेतकर्‍यांवर अन्याय होवू देणार नाही : खा. राजू  शेट्टी

वारणाकाठच्या शेतकर्‍यांवर अन्याय होवू देणार नाही : खा. राजू  शेट्टी

Published On: May 21 2018 1:04AM | Last Updated: May 20 2018 10:40PMइटकरे : वार्ताहर

वारणाकाठच्या शेतकर्‍यांवर  शेतीच्या पाण्यासाठी अन्याय होवू देणार नाही.  पण इचलकरंजी  शहरातील लोकांनाही  पाणी मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन खा. राजू शेट्टी यांनी केले. वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे खासदार राजू शेट्टी यांच्या फंडातून मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. वाळवा पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक  अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य निजाम मुलाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुका भागवत जाधव, यशवंत दूध संघाचे संचालक महेश पाटील, सयाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. शेट्टी म्हणाले, साखरेचे दर पाडायला हे भाजपचे सरकारने पाकिस्तानातून साखर आयात करण्यात आली. देशात साखरेचे उत्पादन असताना शत्रू राष्ट्राकडून कशासाठी साखर आयात केली. भारतातील 
यामुळे साखरेचे भाव पडले गेले. भारतातील  साखर कारखाने या भाजप सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आले आहेत.राहुल महाडिक म्हणाले, जोपर्यंत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी आहेत तोपर्यंत महाडिक कुटुंब तुमच्या पाठिशी आहोत. यशवंत दूध संघाचे संचालक महेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.एस. यु. संदे, डी.के. पाटील, जगन्नाथ पवार, तानाजी पवार, प्रा. शाहू पाटील, शिवाजी पवार, सी. एम. मोरे, मुरलीधर मांगलेकर, संतोष पाटील, संतोष शेळके, गुंडाभाऊ आवटी, सुदर्शन वाडकर, प्रेम उपाध्ये यांच्यासह ग्रामस्थ  उपस्थित होते.