Wed, Nov 21, 2018 21:45होमपेज › Sangli › राष्ट्रवादीला नंबर वन् बनविणार

राष्ट्रवादीला नंबर वन् बनविणार

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 9:13PMबागणी : प्रतिनिधी

राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे शेतकरी, दलित, अल्पसंख्याक आदी घटकांमध्ये अस्वस्थता आहे. अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष म्हणून पायाला भिंगरी लावून राज्यभरात फिरताना राष्ट्रवादीला राज्यात नंबर वन् बनविणार असल्याचे  प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले.  

वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यावतीने जयंत पाटील यांचे बहादूरवाडी येथे स्वागत करण्यात आले. बहादूरवाडी, कोरेगाव येथे जयंत पाटील बोलत होते.  बहादूरवाडी येथे गावचे माजी सरपंच बाजीराव बेनाडे-पाटील, माजी सरपंच विलासराव देसावळे, युवा ग्रामपंचायत सदस्य अनिकेत बेनाडे, विजय जाधव, भीमराव देसावळे, पोपट माने, शिवाजी जाधव, पंढरीनाथ जाधव, पंडित मेस्त्री यांच्यासह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.  

राज्य तसेच केंद्रातील भाजप सरकारचे धोरण शेतकरी, अल्पसंख्याक, दलित यांच्याविरोधात आहे. समाजा-समाजात भांडणे लावून सत्ता भोगणार्‍यांना सत्तेवरुन दूर हटविण्याची गरज आहे. यासाठी जनतेने साथ देण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते जयंत पाटील यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.