Mon, Oct 21, 2019 03:03होमपेज › Sangli › लाच घेताना वाहतूक पोलिसासह दोघांना अटक 

लाच घेताना वाहतूक पोलिसासह दोघांना अटक 

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 11 2018 11:47PMमिरज : शहर प्रतिनिधी 

लाकूड वाहतूक करणार्‍या टेम्पोचालकाकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाहतूक पोलिस महेश पोपट कांबळे व त्याचा साथीदार नंदकुमार संजय सर्वदे (रा. मिरज) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. मंगळवारी दुपारी येथील बसस्थानकाजवळ एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी दिली.

ते म्हणाले, मिरजेमध्ये  पोलिस  कांबळे याने सोमवारी लाकूड वाहतूक करणारा टेम्पो पकडला होता. त्या टेम्पो चालकाकडे त्याने पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्या चालकाने पाचपैकी दोन हजार रुपये दिले. उर्वरित तीन हजार रुपयांची रक्‍कम टेम्पोच्या मालकाला घेऊन पाठव, असे पोलिस कांबळे याने त्या चालकाला सांगितले होते. त्यानंतर टेम्पोमालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आज (दि. 11) दुपारी मिरजेच्या बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला. उर्वरित तीन हजार रुपयांची लाच पोलिस कांबळे याने नंदकुमार संजय सरवदे याच्याकडे देण्यास सांगितले. ती लाच घेताना दोघांनाही पकडण्यात आले.  WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19