Mon, Jan 21, 2019 19:14होमपेज › Sangli › शिराळ्यात लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ अटक

शिराळ्यात लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ अटक

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:16PM

बुकमार्क करा
शिराळा ः प्रतिनिधी

येथील तलाठी सुभाष श्रीपती पाटील (वय 51, रा. इस्लामपूर, मूळ गाव ऐतवडे खुर्द, ता. वाळवा) याला पाच हजारांची लाच घेताना गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. खरेदी जमिनीची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेताना ही कारवाई करण्यात आली.

पावलेवाडी येथील  जमीन तक्रारदारांनी खरेदी केली होती. या जमिनीची नोंद करण्यासाठी दि. 27 डिसेंबर रोजी तलाठी सुभाष पाटील यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी  नोंद घालण्यासाठी सहा हजारांची मागणी तलाठी पाटील यांनी केली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाकडून सापळा रचून  रक्‍कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.   पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक पोलिस फौजदार श्यामसुंदर बुचडे, पोलिस नाईक शरद पोरे, संदीप पावलेकर, आबासाहेब गुंडणके, सर्जेराव पाटील यांनी कारवाई केली.