होमपेज › Sangli › खत्री - अनिकेतच्या वादाची तक्रार पोलिसांनी का घेतली नाही?

खत्री - अनिकेतच्या वादाची तक्रार पोलिसांनी का घेतली नाही?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

मृत अनिकेत व तो जेथे कामाला होता, त्या लकी बॅग या दुकानाचा मालक खत्री यांच्यात झालेल्या वादाचा गुन्हा का दाखल झाला नाही, याची चौकशी आम्ही आणि सीआयडीही करीत आहे. एकूणच या
प्रकरणाचा तपास सीआयडीने योग्य पद्धतीने केला आहे. त्यांच्या तपासावर विश्‍वास ठेवा. त्यांनी काय तपास केला आहे, ते न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर कळेलच, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे - पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. यावेळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे उपस्थित होते.

नांगरे - पाटील म्हणाले, कोथळे प्रकरणात सीआयडीने योग्य तपास केला आहे. त्यांच्या तपासावर विश्‍वास ठेवा. या प्रकरणातील डीएनए चाचणी अहवालाबाबत सीआयडीलाच माहिती आहे. 
मात्र ते तपासातील काही मुद्दे जाहीरपणे सांगणार नाहीत. न्यायालयात दोषारोपपत्र तीन महिन्याच्या आत दाखल होईल, तेव्हा सर्व बाबी समजतील. सुधारगृहातील त्या मुलाची चौकशी करा : नांगरे पाटील येथील दादूकाका भिडे या बाल सुधारगृहातून पलायन केलेल्या पाच अल्पवयीन संशयितांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. या प्रकरणातील एक गुन्हेगार सज्ञान आहे की अल्पवयीन आहे याची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधिकार्‍यांना दिले आहेत, असेही नांगरे पाटील म्हणाले. गांजामुळे घरफोड्या व चेनस्नॅचिंग वाढत आहेत, याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही आदेश दिले आहेत.