Thu, Feb 21, 2019 11:10होमपेज › Sangli › मनपासाठी सुधार समितीची सुसज्ज ‘वॉररूम’

मनपासाठी सुधार समितीची सुसज्ज ‘वॉररूम’

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 8:41PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेची निवडणूक पारदर्शी व्हावी, यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने वॉर रूम तयार करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात समितीच्यावतीने पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, समितीच्यावतीने प्रत्येक प्रभागात आम्ही आमच्या वेगळ्या टीममार्फत सर्वे करीत आहोत. 

समितीच्यावतीने अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्याच्या जोरावरच आम्ही निवडणुकीत उतरत आहोत. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु समितीच्या ध्येयधोरणानुसारच इच्छुकांना संधी दिली जाणार आहे. त्याबरोबर महापालिका निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी आम्ही सुसज्ज अशी ‘वॉररुम’ तयार केलेली आहे. यामधून अन्य उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.  पैसे वाटप, आचारसंहिता भंग या गोष्टींवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. कायदेशीर बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी वकिलांची मदत घेतली जाणारआहे. उमेदवारांना सर्व प्रकारची मदत करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, अर्ज भरणे, कायदेविषयक सल्ला देणे आदी कामे वॉररूममधून केली जाणार आहेत. समितीच्यावतीने प्रत्येक प्रभागात ही यंत्रणा राबविण्यात येणार आहे. हे सर्व काम वॉररूममधून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.