कडेगाव : शहर प्रतिनिधी
सोनहिरा कारखान्याचा वजन काटा निर्दोष असल्याचा निर्वाळा शासनाच्या भरारी वजनकाटा पथकाने दिला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी दिली.
कदम म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी केली. मान्यता प्राप्त लोखंडी वजने काट्यावर ठेवून त्याचे वजन अचूक दाखवत आहे का, याची पाहणी केली. तसेच संगणकावर वजन कमी -जादा करता येते का, याची देखील तपासणी केली. यामध्ये पथकाला कोणतेही दोष आढळून आले नाहीत.त्यामुळे पथकाचे प्रमुख कडेगाव तालुक्याचे नायब तहसीलदार विजय धायगुडे यांनी सोनहिरा कारखान्याचा काटा निर्दोष असल्याचे जाहीर केले.या पथकात चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज सोनवलकर, वैधमापन शास्त्राचे निरीक्षक दिलीप राजमाने, एस. एस. चोथे सहभागी होते.
यावेळी कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम, दिलीप सूर्यवंशी, पी. जाधव, सयाजी धनावडे, कार्यकारी संचालक शरद कदम उपस्थित होते.