Sat, Nov 17, 2018 06:24होमपेज › Sangli › शिराळा तालुक्यात पाणी टंचाईचे संकट

शिराळा तालुक्यात पाणी टंचाईचे संकट

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 10:27PMशिराळा : विठ्ठल नलवडे 

शिराळा तालुक्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीस पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तालुक्यात 49 पाझर तलाव आहेत. त्यापैकी 10 पाझर तलावात 10टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्‍लक राहिला आहे. तर 18 पाझर तलावात 25 टक्के, तर उर्वरित तलावात 50 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्‍लक राहिला आहे. धरण व पाझर तलावातील पाणी कडक उन्हामुळे कमी होऊ लागले आहे.

10 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असलेेले तलाव : भाटशिरगाव, बेलदारवाडी, लादेवाडी, प.त. शिराळा नं. 1 व नं. 2, भैरेवाडी, शिवरवाडी, शिरशी काळेखिंड शिरसटवाडी, सावंतवाडी., 25 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असलेले तलाव : निगडी  दरा, निगडी खोकडदरा, निगडी जुना वाकुर्डे खुर्द, शिरशी भैरवदरा, शिरशी कासरकी, मेणी आटुगडेवाडी, चव्हाणवाडी नं. 1, चव्हाणवाडी नं. 2, पावलेवाडी नं. 1 व नं. 2, तडवळे, इंग्रुळ, कापरी रेड नं. 2, खेड, भटवाडी, करमाळा नं. 2, उर्वरित तलावात पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. एमआयडीसीसाठी मोरणा धरणातील पाण्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर शिराळा, तडवळे, उपवळे, बिऊर, पाडळी, भाटशिरगाव या गावास शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. पाणी सोडल्यामुळे  शेतीसाठी पाणी मिळते. वाकुर्डेचे पाणी मोरणा धरणात सोडण्याची मागणी आहे.