होमपेज › Sangli › चांदोली धरणातून पाणी सोडले

चांदोली धरणातून पाणी सोडले

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 11:04PMवारणावती : वार्ताहर 

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातून येणार्‍या पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे  धरणाचे चारही वक्राकार दरवाजे  0.25 मीटरने उचलले आहेत. दरवाजातून  3595 व वीजनिर्मिती केंद्रातून  782 असा  एकूण  4377 क्युसेक्स विसर्ग  शुक्रवारी सकाळी  वारणा नदीत सुरू  केला आहे. त्यामुळे ती दुथडी भरून वाहते आहे. 

शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेल्या तीन दिवसांपासून  संततधार सुरू आहे. मध्यंतरी आठ ते दहा दिवस पावसाने उघडीप दिली होती . त्यामुळे भात पिके जोमात आली आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाने  पुन्हा सुरुवात केली आहे. 

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक  5486 क्युसेक आहे. धरणात सध्या  33.34 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण  96.90 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात  15 मिलीमीटर पावसासह एकूण  2186 मिलीमीटर पावसाची नोंद  येथील पर्जन्यमापकावर झाली आहे.  

धरण प्रशासनाने धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने  आज  सकाळी दहा वाजता धरणाचे चारही वक्राकार दरवाजे खुले केले. सांडव्यातून विसर्ग वारणा नदीत सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असा इशारा त्यांनी दिला आहे. धरण लवकरच शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.