Mon, Jun 24, 2019 21:45होमपेज › Sangli › पाणीप्रश्‍नासाठी आणखी काम करावे लागेल

पाणीप्रश्‍नासाठी आणखी काम करावे लागेल

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 9:06PMविटा  : प्रतिनिधी

पाणी अडवणे, ते वाचवणे, सर्वांपर्यंत पोहोचवणे यासाठी आणखी खूप काम करावे लागेल, असे  प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी केले.               

येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठात दलित महासंघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांना ‘डॉ. बाबासाहेब आबंडेकर सामाजिक कृतज्ञता  पुरस्कार’ श्री. राणा यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. 

जिल्हा परिषद सदस्या नीलम सकटे, अ‍ॅड. सुभाष पाटील, सुभाष पवार, दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, प्रा. पुष्पलता सकटे, रविंद्र भिंगारदेवे, विजया पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.        

डॉ. पवार म्हणाले, समाजाला विधायक दिशा देणार्‍या माणसांची संख्या कमी होत आहे. अशा बिकट परिस्थितीत संपतरावांनी होकायंत्रासारखे काम केले आहे. प्रा. सकटे म्हणाले, संपतराव पवार व डॉ. भारत पाटणकर यांची प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. पुरोगामी चळवळीने संपतराव पवार यांची दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.

बलवडीचे सरपंच प्रवीण पवार पांडुरंग शितोळे, बाबा बर्वे, तानाजी पाटील, रघुनाथ पवार, शिवाजी पवार, दिलीप सव्वाशे, विलास चौथाई, सतीश लोखंडे, दिनकर कास्कर उपस्थित होते. सुभाष पाटील यांनी स्वागत केले.  विक्रम भिंगारदेवे यांनी आभार  मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.