Mon, Nov 19, 2018 16:51होमपेज › Sangli › कोल्हापूर रस्त्यावर मोकळ्या प्लॉटवर मलनिस्सारणचे पाणी; आरोग्यास बाधा

कोल्हापूर रस्त्यावर मोकळ्या प्लॉटवर मलनिस्सारणचे पाणी; आरोग्यास बाधा

Published On: Jun 15 2018 1:07AM | Last Updated: Jun 14 2018 8:24PMसांगली : प्रतिनिधी

कोल्हापूर रस्त्यावर हॉटेल महाराजा शेजारी रिकाम्या प्लॉटमध्ये मलनिस्सारणचे पाणी साचले आहे. त्याचा फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे. पाण्याच्या उग्र वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचे उत्पत्ती केंद्रही बनले आहे. महापालिकेने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिवाजी पाटील व नागरिकांनी केली आहे. 

कोल्हापूर रस्त्यावर हॉटेल महाराजा शेजारी मोकळ्या प्लॉटमध्ये मलनिस्सारणचे पाणी साचले आहे.  या पाण्याच्या दुर्गंधीयुक्त वासामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा आली आहे. महापालिकेने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने  उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. महापालिका क्षेत्रातील मोकळे प्लॉट अस्वच्छतेचे आगर बनले आहेत. या मोकळ्या प्लॉटवर झाडे झुडुपे गवत वाढलेले असते. मोकाट जनावरांचा तिथे सारखा वावर असतो. या मोेकळ्या प्लॉटमध्ये गटारीचे पाणी, पावसाचे पाणी साचून राहते. साचलेल्या पाण्याची डबकी म्हणजे डासोत्पत्ती स्थाने ठरत आहेत. त्यातून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव होत असतो. संबंधित प्लॉटधारकांनी हे प्लॉट स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष होते. महापालिकेनेही अशा प्लॉट धारकांवर कारवाईची मागणी होत आहे.