Fri, Apr 26, 2019 03:19होमपेज › Sangli › प्रभागरचना निवडणूक आयोगाकडे 

प्रभागरचना निवडणूक आयोगाकडे 

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 11:13PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी  प्रारूप प्रभागरचना व  आरक्षणाचा अहवाल  शनिवारी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला.  आयोगाकडून छाननी करून तो दि. 13 मार्चपर्यंत  महापालिकेकडे परत येईल. त्यानंतर तो महापालिकेमार्फत  दुरुस्त करून  20 मार्चरोजी खुला केला जाईल. कोणत्या प्रभागात कसे आरक्षण निघते, प्रभागांची  हद्द कोठेपर्यंत  आहे, यावर विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे.

महापालिकेच्या सातवी  निवडणूक  जूनअखेर  होणार आहे. यासाठी निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी आघाडी, जिल्हा सुधार समिती, महापालिका संघर्ष समिती आदी पक्ष निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. 

 गेल्या 2013 च्या लोकसंख्येच्या निकषानुसार तीन सदस्यीय 18 तर एक तीन व एक पाच सदस्यीय प्रभाग असे एकूण 20 प्रभाग असल्याची चर्चा आहे. तब्बल 25 ते 30 हजार लोकसंख्येचे हे प्रभाग आहेत. यामुळे या प्रभागाच्या हद्दी कुठेपर्यंत विस्तारल्या आहेत? यात मतांचे गणित कसे जमणार? कोणते प्रभाग आरक्षित आणि खुुल्यातून कोणाला संधी मिळणार, हे गुलदस्त्यात आहे. निवडणूक आयोगाकडून 13 तारखेपर्यंत याचा छाननी अहवाल महापालिकेकडे येईल. 

आयोगाच्या सूचनेनुसार त्यात दुरुस्ती करून  प्रभागरचना आरक्षणांचा ड्रॉ काढून ते खुले करायचे आहे. त्यामुळे विद्यमान आणि इच्छुकांना याची उत्सुकता लागून राहिली आहे.