Thu, May 23, 2019 04:19होमपेज › Sangli › वांगी अपघात : ट्रॅक्टर चालकास अटक

वांगी अपघात : ट्रॅक्टर चालकास अटक

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:17AM

बुकमार्क करा
कडेगाव : शहर प्रतिनिधी 

वांगी येथे झालेल्या क्रूझर गाडी व ट्रॅक्टरच्या समोरासमोरील अपघातात क्रूझरमधील सहा पैलवानांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फरार झालेल्या ट्रॅक्टरचालक दिनकर तुकाराम पवार (वय 47, रा. राजापूर, ता. तासगाव) याला चिंचणी-वांगी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

वांगी येथे झालेल्या क्रूझर गाडी व ट्रॅक्टरच्या समोरासमोर अपघातात पै. शुभम अंकुश घार्गे, पै. सौरभ अनिल माने, पै. आकाश दादासोा देसाई, पै. अविनाश सर्जेराव गायकवाड, पै. विजय शिवाजी शिंदे व क्रूझरचा चालक रणजित दिनकर धनवडे यांचा मृत्यू झाला. तर तुषार धनाजी निकम, सुदर्शन सुरेश जाधव, अनिकेत अशोक जाधव, अजय प्रकाश कासुर्डे, अनिकेत कृष्णा गावडे, प्रतीक निकम, अनिल पाटील, रितेश चोपडे हे आठजण गंभीर जखमी झाले आहेत.

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती तालीम मंडळाचे हे सर्व नामांकित पैलवान होते. शुक्रवार दि. 12 रोजी ते औंध (जि. सातारा) येथील कुस्ती मैदानासाठी गेले होते. औंध येथील कुस्ती मैदान संपल्यानंतर हे पैलवान क्रूझर गाडीने कुंडलकडे माघारी येत असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वांगी परिसरातील चव्हाण वस्तीजवळ हा अपघात झाला होता.