Sun, Aug 25, 2019 02:17होमपेज › Sangli › विटा : तुकडे पडणाऱ्या पाचशेच्या नोटांचे गूढ उकलणार?(video)  

विटा : तुकडे पडणाऱ्या पाचशेच्या नोटांचे गूढ उकलणार?(video) 

Published On: May 16 2019 4:31PM | Last Updated: May 16 2019 6:24PM
विटा : विजय लाळे

वाळलेले झाडाच्या पानाप्रमाणे तुटणाऱ्या मोडणाऱ्या पाचशेच्या नोटांबाबतधक्कादायक म्हणावी अशीच आणखी एक गोष्ट समोर आली आहे  संबंधित वृद्ध महिलेकडे या नोटा त्यांच्या मुंबई येथील जावयांकडून आल्या होत्या आणि त्या सर्व नोटांचा नंबर हा सीरियल नंबर प्रमाणे सलग असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी नेमके याच नोटांच्याबाबत हा प्रकार का घडतोय? का दीड वर्षापूर्वी झालेल्या नोटाबंदीनंतर आलेल्या काही नोटा खरंच हलक्या प्रतीच्या कागदा पासून बनवल्या गेल्यात का? ...अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या तुकडा पडलेल्या 500च्या नोटा या चलनातील खऱ्या नोटा असून यातील एक नोट विट्याच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेकडून संबंधितांना बदलून देण्यात आली आहे. अन्य एक नोट तुकड्या-तुकड्यांनी जोडून ती तक्रारदारांच्या मागणीनुसार रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांनी सांगितले आहे. 

वाचा : विट्यात पाचशेच्या नोटांचे तुकडे पडू लागल्याने खळबळ (video)

विट्यात 500 रुपयांच्या नोटांचे वाळलेल्या झाडाच्या पानाप्रमाणे तुकडे पडत असल्याच्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये औत्सुक्याचे त्याचबरोबर भीतीचे वातावरण पसरले आहे. 

काय आहे हा प्रकार....

त्‍याचे झाले काय..सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कृष्णाबाई शिंदे  (वय 65 )या वृद्ध महिलेने त्यांच्याकडे असणाऱ्या  500 रुपयांच्या नोटांचे हाताने घडी घालताच तुकडे पडत असल्याचे सांगितले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. श्रीमती शिंदे या विटा शहरातील एका उपनगरात पत्रे वजा छप्पर अशा छोट्या घरात राहतात. त्यांच्या पतीचा पंधरा वर्षांपूर्वी आणि दोन मुलांचा दहा वर्षांपूर्वी मृत्यू झालेला आहे. सध्या दोन शेळ्यासह एकट्याच राहत आहेत. मोलमजुरी करून त्या आपला चरितार्थ चालवतात त्यांना एक मुलगी असून ती मुंबई येथे असते .त्या मुलीचे पती ज्योतीराम तुकाराम फुके हे मुंबईच्या बेस्टमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरीस आहेत . ते अधूनमधून आपल्‍या सासूस आर्थिक मदत करीत असतात.

 दीड महिन्यांपूर्वी ज्योतीराम फुके यांनी आपल्या सासू शिंदे यांना पाचशे रुपयांच्या 14 नोटा म्हणजे एकूण सात हजार रुपये दिले होते. या सर्व नोटा शिंदे यांनी आपल्याजवळील पाकिटात घालून कपाटात ठेवून दिल्या होत्या. दरम्यान चार दिवसांपूर्वी सोमवारी शिंदे यांनी त्या नोटा मधील 8 नोटा खर्चून बोकड खरेदी केला.  त्यानंतर मंगळवारी मिरच्या आणण्यासाठी त्या बाजारात गेल्या. यावेळी शिंदे यांनी उरलेल्या 6 नोटा रुमालात ठेवून कमरेला बांधून नेल्या होत्या. प्रत्यक्षात व्यापाऱ्याला पैसे द्यायच्या वेळी रुमाल सोडला असता काही नोटांचे तुकडे पडलेले आढळले. त्यावर घाबरून जाऊन त्यांनी आपल्याकडील सर्वच नोटा तपासून पाहिले असता घडी घालताच सर्वच नोटांच्या तुकडे होत असल्याचे दिसले. सहाजिकच काहीही खर्च न करता त्या घरी परत आल्या. आणि घडला प्रकार सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांना सांगितला. यानंतर सर्वात पहिल्‍यांदा 'दैनिक पुढारी' ने या या प्रकरणाचा खुलासा सर्वांसमोर केला. 

ओकेडी 1741 या सिरीयल सुरू होणाऱ्या नोटांच्या बाबत हा प्रकार 

ज्या नोटांचे तुकडे पडले आहेत त्या सर्व नोटा या एकाच सिरीयल नंबरच्या असलेल्या दिसून येत आहेत. एक 500 रुपयेची नोट विटा येथील स्टेट बॅंकेच्या शाखेकडून बदलून देण्यात आली आहे. त्यानंतर रिझर्व बँकेकडे पाठवायची म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा विटा यांच्याकडे जमा करण्यात आलेल्या नोट क्रमांक - 0KD174173 असा आहे. तर संबंधित महिला कृष्णाबाई शिंदे यांच्याकडे सध्या असलेल्या तुटलेल्या नोटांचे आणखी पुढचे नंबर आहेत, 0KD174174 आणि 0KD174175. म्हणजे ओकेडी 1741 या सिरीयल सुरू होणाऱ्या नोटांच्या बाबत हा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारचे अर्थमंत्रालय यांनी याबाबत तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.