Sat, Feb 16, 2019 18:50होमपेज › Sangli › कृष्णा खोरे महामंडळाचे खासदार संजय पाटील उपाध्यक्ष  

कृष्णा खोरे महामंडळाचे खासदार संजय पाटील उपाध्यक्ष  

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 11:08PMतासगाव : शहर प्रतिनिधी

सांगली जिल्ह्याचे खासदार संजय पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी  निवड निश्‍चित झाली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरापासून या पदावर एक चांगले नेतृत्व बसवण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर खासदार पाटील यांच्या नावावर सोमवारी शिक्कामोर्तब होईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, महामंडळाचे उपाध्यक्षपद हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे आहे. तर यामुळे जिल्ह्यातील पाणी योजनांच्या कामांना गती येण्यास मदत होणार आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजपमध्ये प्रचंड उत्साह आहे.