Mon, Jul 22, 2019 01:14होमपेज › Sangli › वीस हजार शेतकर्‍यांच्या माहितीची पडताळणी सुरू

वीस हजार शेतकर्‍यांच्या माहितीची पडताळणी सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेंतर्गत ‘मिसमॅच’ यादीतील 19 हजार 537 शेतकर्‍यांच्या कर्जाबाबतच्या माहितीची पडताळणी तालुकास्तरीय समितीकडून सुरू आहे. मंगळवारी पडताळणी पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. कर्जमाफीसाठी पात्र आठव्या सुधारित ‘ग्रीनलिस्ट’कडे शेतकरी व जिल्हा बँकेचे लक्ष लागले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएससाठी शेतकर्‍यांकडून ऑनलाईन अर्ज घेतलेले आहेत. दरम्यान 19 हजार 537 शेतकर्‍यांच्या अर्जातील माहिती आणि विकास सोसायटी, बँकांकडून शासनास सादर झालेली माहिती ‘मॅच’ होत नाही. माहितीत तफावत आहे. ही ‘मिसमॅच’ यादी पडताळणीसाठी तालुकास्तरीय समितीकडे आलेली आहे. पडताळणीनंतर माहिती शासनाकडे अपलोड होईल व पात्र शेतकर्‍यांची ‘ग्रीनलिस्ट’ येईल. 

शासनाकडून पात्र शेतकर्‍यांच्या आठ ग्रीनलिस्ट प्रसिद्ध झालेल्या आहेत. आठवी ग्रीनलिस्ट शासनाने मागे घेतली होती. मिसमॅच यादीतील 19 हजार 537 शेतकर्‍यांच्या पडताळणीनंतर आठवी सुधारित ‘ग्रीनलिस्ट’ शासनाकडून येईल. 

कर्जवसुलीवर परिणाम; शासन निर्णय प्रलंबित

सन 2001 ते 2009 पर्यंतच्या पात्र थकबाकीदार  व वंचित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच दि. 30 जुलै 2017 च्या थकबाकीदार शेतकर्‍यांनाही काही दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा शासनाने केलेली आहे. मात्र अजून शासन निर्णय जारी झालेला नाही. त्याचा परिणाम बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. शासन निर्णय तातडीने जारी होणे गरजेचे आहे. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस... अब तक !

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभाच्या एकूण 8 ग्रीनलिस्ट प्रसिद्ध. त्रुटींमुळे आठवी ‘ग्रीनलिस्ट’ दुरुस्तीसाठी शासनाने मागे घेतलेली आहे. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएसपात्र शेतकरी : 1 लाख 33 हजार 500

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभ रक्कम : 297. 64 कोटी रुपये

जिल्हा बँकेला शासनाकडून आले : 230.30 कोटी रु. (शेतकरी- 109340)

 

Tags : sangli, sangli news, farmers, information,


  •