Thu, May 23, 2019 20:53
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › सांगलीची वैशाली पवार बीं ‘मिसेस इंडिया’

सांगलीची वैशाली पवार बीं ‘मिसेस इंडिया’

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: Jun 01 2018 12:06AMसांगली : प्रतिनिधी

येथील वैशाली पवारने गुरुवारी ‘मिसेस इंडिया’चा  मुकुट पटकावला. ‘मिसेस वर्ल्ड’साठी आता तिची निवड झाली आहे. दिल्ली येथे चार दिवस ही स्पर्धा सुरू होती.मूळ सांगलीकर असलेली आणि कर्नाटकची (बंगळूर) सून झालेल्या वैशालीची नुकतीच नवी दिल्लीतील ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली होती. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी विविध फेर्‍यांत तिने चुणूक दाखवली. मुलाखतीमध्ये प्रेक्षणीय वारसा स्थळांच्या संरक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनावर विशेष भर आवश्यक असल्याचे तिने सांगितले. यामध्ये तिला सर्वाधिक गुण मिळाले.

वैशाली या   वसंतदादा साखर कारखान्याच्या माजी चीफ केमिस्ट एस. आर. पवार यांच्या कन्या आहेत. बापट बालविद्यामंदिरमध्ये प्राथमिक शिक्षण,  ग. रा. पुरोहितमध्ये माध्यमिक आणि कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. व्हीजेटीआय मुंबईतून पदव्युत्तर पदवी तर अमेरिकेत जॉर्ज वाशिंग्टन विद्यापीठात प्रकल्प व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले. सध्या बेंगलोरमध्ये सिस्को या आंतरराष्ट्रीय कंपनीत ती सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. वैशाली ही  सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.

नऊ स्वयंसेवी संस्थांबरोबर त्या शासकीय शाळा, स्थलांतरीत मुले, अनाथआश्रम, पर्यावरण संवर्धन, नदी संरक्षण, रक्त संकलन आदी उपक्रमात तिचा सहभाग आहे. शालेय जीवनात विविध स्पर्धात शंभरहून अधिक बक्षिसे पटकावली. क्रीडाक्षेत्रात वैयक्तिक व सांघिक खेळात 28 ट्रॉफी आणि पदके मिळवली. तिला मॉडेलिंगची देखील आवड आहे. 2016 मध्ये मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन’ सौंदर्य स्पर्धेचा मुकूट पटकावला. मिसेस इंडिया वर्ल्डवाईड’ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.  

कर्नाटकातील मानाच्या सौंदर्य स्पर्धेत तिला परीक्षक म्हणूनही काम पाहिले. सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या कसोटीवर तिने स्वत:ला सिद्ध केले.   स्पर्धेत निवड झाल्यानंतर वैशालीवर लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या होत्या. दिल्ली येथील ‘किंग्डम ऑफ ड्रीम्स’ मध्ये  ही स्पर्धा रंगली. पहाटे पाच वाजता दिवस सुरू होऊन मध्यरात्रीनंतर दोन किंवा पहाटे तीन वाजता संपायचा.