Tue, Jun 18, 2019 21:26होमपेज › Sangli › संख येथे शुक्रवारी अप्पर तहसीलचे उद्घाटन

संख येथे शुक्रवारी अप्पर तहसीलचे उद्घाटन

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 1:23AMमाडग्याळ : वार्ताहर

संख (ता.जत) येथे शुक्रवार, दि. 26 जानेवारीरोजी अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार आहे. यासाठी पाटबंधारे कार्यालयाच्या सात इमारती महसूल विभागाने ताब्यात घेऊन दुरूस्ती व स्वच्छता सुरू केली आहे. तसेच संखमध्ये तलाठी व मंडल कार्यालयाची नवीन इमारतीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

शासनाने संख येथे 10 ऑगस्ट 2017 रोजी अप्पर तहसील कार्यालय मंजूर केलेे होते. यानंतर अप्पर तहसील कार्यालयात माडग्याळ, संख, उमदी व मुंचडी मंडल कार्यालयातील गावांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये उमदी, मुंचडी व माडग्याळ मंडलातील गावांनी याबाबत विरोध केला होता. त्यानंतर न्यायालयाने शासनाला माडग्याळ व उमदीचे प्रस्ताव दाखल करून घ्यावेत व तीन महिन्यात याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. 27 डिसेंबरला तीन महिने पूर्ण झाली आहेत.आता शासनाने संख येथे उद्घाटनाची तयारी सुरू केली आहे.

यासाठी संख येथे पाटबंधारे शाखा कार्यालय आहे. या कार्यालयाचा परिसरात जागा भरपूर आहे. महसूल विभागाने पाटबंधारे कार्यालयास पत्र देऊन सात इमारती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत पाटबंधारे कार्यालयाने दुजोरा दिला आहे. तसेच सात इमारतीत एकूण चौदा खोल्या आहेत. महसूल विभागाने याठिकाणी सध्या इमारतीची स्वच्छताही सुरू केली आहे. येथील झाडे-झुडपे तोडण्यात आली आहेत.  इमारतीतीच्या फरशा व दरवाजांची तोडमोड  झाली आहे. त्याची   दुरूस्ती सुरू आहे. परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. संख गावातच तलाठी व मंडल कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम  पूर्ण झाले आहे. या इमारतीतही  अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.