Thu, Apr 25, 2019 06:20होमपेज › Sangli › मतदार यादीतील नावे अद्यावत करा

मतदार यादीतील नावे अद्यावत करा

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 11:22PMसांगली : प्रतिनिधी 

मतदार यादीत ज्यांनी रंगीत छायाचित्र आणि बदललेला पत्ता अद्ययावत केलेला नाही,  त्यांनी त्वरित संबंधित मतदान नोंदणी अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. आवश्यक ती दुरस्ती करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विजयकुमार  काळम - पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, मतदार यादीत ज्या मतदारांनी   रंगीत छायाचित्र आणि बदललेला पत्ता अद्ययावत केला नाही त्यांची नावे नियमाप्रमाणे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  बर्‍याच मतदारांनी मतदार यादीसाठी   रंगीत छायाचित्र दिलेले नाही. अशा मतदारांची संख्या जिल्ह्यात 20 हजार 698 आहे. अनेक मतदार   मतदार यादीमध्ये दिलेल्या पत्त्यावर आढळून येत नाहीत. जिल्ह्यात असे 43 हजार 983 मतदार आहेत. अशा मतदारांची नावे नियमाप्रमाणे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ते म्हणाले, मतदार यादीत नोंदणीसाठी दिव्यांग मतदारांनीही नावनोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी फॉर्म क्रमांक 6 भरावा.  दिव्यांग मतदारांनी संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा व  नाव नोंदवावे.  दिव्यांग कल्याणासाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी मदत करावी.