Tue, May 21, 2019 22:39होमपेज › Sangli › मिरजेत मनपासाठी राजकीय धुळवड सुरू

मिरजेत मनपासाठी राजकीय धुळवड सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मिरज : जालिंदर हुलवान 

आगामी महापालिका निवडणुकीसाठी मिरजेत रणनीती आखली जात आहे. त्याची राजकीय धुळवड आतापासूनच सुरू झाली आहे.  भाजप आणि शिवसेनेत मनपा ताब्यात घेण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीही आक्रमकपणे तयारीला लागली आहे. 

सध्या महापालिकेमध्ये मिरजेतून शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही. मिरजेत भाजपचा आमदार आहे. मात्र महापालिकेत भाजपचा नगरसेवक एकच आहे. त्यामुळे भाजपला आणि शिवसेनेला शुन्यातूनच सुरूवात  करावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना टार्गेट केले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ग्रामीण भागातील काही नेत्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलनेही केली. त्याला शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपचे कार्यकर्तेही एकवटले. या प्रकारातून राजकीय धुरळा उडाला. या सर्व घटनांमध्ये राजकारणच जास्त बघायला मिळाले. मात्र या राजकारणामध्ये काही प्रशासकीय अधिकार्‍यांना त्याचा त्रास सोसावा लागला आहे. त्यातही राजकीय वास आलाच. मात्र हा सगळा वाद ग्रामीण भागामध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये होता आणि सध्या तोंडावर निवडणूक आहे ती महापालिकेची. त्यामुळे हा वाद महापालिका निवडणुकीसाठी नव्हता तर अन्य कारणांसाठी होता हे स्पष्ट आहे.  महापालिका निवडणुकीसाठी मिरजेची जबाबदारी ही आमदार सुरेश खाडे आणि भाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे यांच्यावरच असणार आहे. 

त्यातच सध्या जुन्या नव्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा वाद सुरू झाला आहे. त्या संदर्भात सांगलीत काही दिवसांपूर्वी एक बैठकही झाली. त्यामध्ये मिरजेच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपला हा नव्या जुन्यांचा वाद मिटविण्याची गरज आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यात जनसुराज्य युवा शक्ती हा पक्ष भाजपच्या मित्र पक्षांच्या यादीत जाऊन बसला आहे. या पक्षाचे प्रमुख विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत जनसुराज्यलाही भाजपला बरोबर घ्यावे लागणार आहे. दुसरीकडे शिवसेना हा भाजपचा मित्र पक्षही निवडणुकीत जोरात उतरणार आहे.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मिरजेत नुकतीच सभा झाली. त्या सभेत त्यांनी महापालिका ताब्यात देण्याचे आवाहन केले.