Wed, Jan 16, 2019 22:27होमपेज › Sangli › अज्ञात वाहनाच्या धडकेत कामेरीचा तरूण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत कामेरीचा तरूण ठार

Published On: Aug 30 2018 1:29AM | Last Updated: Aug 30 2018 12:10AMइस्लामपूर : शहर वार्ताहर

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गानजिक कामेरी (ता. वाळवा) येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने प्रशांत दिलीप नाईक (वय 20, रा. कामेरी) हा तरूण ठार झाला. हा अपघात मंगळवारी रात्री घडला. मृत प्रशांत हा महामार्गाकडेने लक्ष्मी मंंदिराकडे प्रसाद घेण्यासाठी निघाला होता. या अपघाताची इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.  

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : कामेरी येथील लक्ष्मी मंदिरात महाप्रसाद होता. प्रशांत  प्रसाद घेण्यासाठी चालत निघाला होता. रात्री अज्ञात वाहनाने त्याला पाठीमागून जोराची धडक दिली. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. 

बेशुद्ध अवस्थेत प्रशांत महामार्गाकडेला पडला होता. मित्रांनी मोटारसायकलवरून त्याला  इस्लामपूर येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अमोल शिंगाडे याने पोलिसांत फिर्याद दिली.