Tue, Feb 19, 2019 06:46होमपेज › Sangli › कुपवाडमध्ये विनापरवाना पाच लाखांचे मसाले जप्त

कुपवाडमध्ये विनापरवाना पाच लाखांचे मसाले जप्त

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:38PMसांगली : प्रतिनिधी

कुपवाड येथील मे. सुंधा ट्रेडींग या विनापरवाना व चुकीच्या पत्त्याने मसाले निर्मिती करणार्‍या फर्मवर अन्‍न-औषध प्रशासनाने शुक्रवारी छापा टाकला. यावेळी  5 लाख 28 हजार 30 रूपये किंमतीचा मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आल्याचे सहायक आयुक्त (अन्न) एस. बी. कोडगीरे यांनी सांगितले.

ते म्हणाले, कुपवाड एमआयडीसीतील मे. सुंधा ट्रेडींग पेढीमध्ये परवाना न घेता व चुकीचा पत्ता असलेलेे लेबल लावून मसाले पॅकिंगचा व्यवसाय चालू होता. त्याची माहिती मिळताच पथकाने छापा टाकला. यावेळी कस्तुरी मेथी 1 हजार 260 किलो, मोहरी 1 हजार 130 किलो, जिरा 1 हजार 60 किलो, ओवा 850 किलो, मिरची पावडर 2 हजार 830 किलो, हळद पावडर 50 किलो असा साठा आढळून आला. हा साठा कोणाकडून खरेदी केला व कोणास विकलेला आहे याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नव्हते.

कोडगिरे म्हणाले, यामुळे त्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन 5 लाख 28 हजार 30 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच अन्न पदार्थ पॅकिंगकरता वापरण्यात येणार्‍या लेबलचे 64 हजार 530 रूपये किंमतीचे 24 बंडल जप्त करण्यात आले. तसेच या पेढीस व्यवसाय बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली. 

ते म्हणाले, ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ए. ए. पवार, आर. आर. शहा व नमुना सहायक श्री. साबळे यांच्या पथकाने केली.